जाहिरात
Home » National » Delhi » Desi Bofors Gun Passes The Test

देशी बनावटीची ‘बोफोर्स’ तोफ

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 03:00AM IST
देशी बनावटीची ‘बोफोर्स’ तोफ

नवी दिल्ली - वादग्रस्त ‘बोर्फार्स’ मुळे थंडावलेल्या हॉवित्झर तोफा पुन्हा धडाडणार आहेत. अत्याधुनिक तोफांची देशाअंतर्गत निर्मिती केली जाईल. त्यासाठी टाटा, महिंद्रा, एल अँड टी, बीईएलसारख्या कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

देशातील संरक्षण संशोधनातील सर्वाेच्च संस्था असलेल्या डिआरडीओने यासंदर्भात भारतीय कंपन्यांसोबत चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. देशी बनावटीच्या तोफांच्या निर्मितीच्या प्रकल्पात किती व्यवहार्यता आहे, यावरही विचार-विनिमय करण्यात येणार आहे. अ‍ॅडव्हान्स टॉवड् अर्टीलरी गन्स सिस्टिम (एटीएजीएस) देखील या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेत टाटा पॉवर, एल अँड टी, भारत फोर्ज, महिंद्रा डिफेंस सिस्टिम, ‘भेल’ , बीइएल या खासगी-सरकारी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला होता. लांबचे लक्ष्य अचूकपणे टिपणे, खराब स्थितीत देखील टिकून रहाण्याची क्षमता अशा गोष्टींची तोफ बनवताना आवश्यकता भासणार आहे. शस्त्राच्या निर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञान तयार करताना नियंत्रण व्यवस्था, ऑटोमेशन, रिकॉइल मॅनेजमेंट, प्रत्यक्ष प्रदर्शन या गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे.लष्कराचे जबलपूरमध्ये स्वत:ची शस्त्र निर्मितीची व्यवस्था आहे. त्याचबरोबर तेथे शस्त्रविषयक मंडळही आहे. त्याच्या साह्याने तोफांची निर्मिती केली जाऊ शकते, अशी अपेक्षा लष्कराला वाटते.

पुण्यात निर्मितीचे काम - डीआरडीओच्या पुण्यातील शस्त्र संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (एआरडीइ) तोफ निर्मितीचे काम सुरू आहे. 155 मिमी आकाराची ही तोफ आहे.

तोफ बंद - बोर्फार्स प्रकरण 1986 मध्ये चांगलेच गाजले होते. बोर्फार्समधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर तोफांची निर्मिती वादात सापडली होती. त्यानंतर लष्कराकडून तोफ निर्मितीचा प्रयत्न पुन्हा झाला नव्हता.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment