जाहिरात
 
 
 

अहमदाबाद येथील आयआयएममध्ये 'धनुष'

 
Source: दिव्य मराठी नेटवर्क   |   Last Updated 01:21(11/02/12)
 
 
 

अहमदाबाद - ‘कोलावेरी डी’ या गाण्याच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेल्या दाक्षिणात्य अभिनेता गायक धनुष याने अहमदाबाद येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. ‘कोलावेरी डी’ च्या यशाचे रहस्य त्याने या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. हे गाणे संगीतबद्ध करणारा 21 वर्षीय संगीतकार अनिरुद्धही या वेळी उपस्थित होता.

कंटेपररी फिल्म इंडस्ट्री अभ्यासक्रमाच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांना व्याख्यान दिल्यावर धनुषने आयआयएम - ए सुंदर असून लोकही चांगले असल्याचे ट्विटरवर म्हटले आहे. आपले हे व्याख्यान चांगले झाल्याचेही त्याने म्हटले आहे.  हे व्याख्यान देण्यापूर्वीही धनुषने एक मजेशीर ट्विट केले होते. तो म्हणाला की मी आयआयएममध्ये व्याख्यान देण्यास जात आहे, पण माझे इंग्रजी तितके चांगले नाही. पण चिंता नाही कारण मी भारतीय आहे, इंग्रज नाही. हाहाहा... देव भले करो! या व्याख्यानादरम्यान धनुषने सांगितले की कोलावेरी डीच्या यशानंतर आगामी ‘3’ चित्रपट तामिळसह तेलगु व हिंदी भाषेतही प्रसिद्ध होणार आहे. पूर्वी या चित्रपटाच्या 400 प्रिंट निघणार होत्या पण आता 1000 प्रिंट काढल्या जाणार आहेत.  या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे आपल्याला अनेक ऑफर्स आल्या. त्याचबरोबर आगामी काळात चांगले संगीत देण्याची जबाबदारी व लोकांच्या अपेक्षाही वाढल्याचे तो म्हणाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment