Home » National » Other State » Election Going On In Nagaland State Assembly

नागालँड, मेघालयमध्‍ये मतदानाला सुरूवात

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 11:45AM IST
नागालँड, मेघालयमध्‍ये मतदानाला सुरूवात

कोहिमा/शिलॉंग- नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी कडक सुरक्षेत मतदानाला आज (शनिवारी) सुरूवात झाली. दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 60 जागांसाठी मतदान होणार आहे. मेघालयात एकूण 345 तर नागालँडमध्ये 179 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.राज्‍यातील 11.93 लाख मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. नागालँडमध्ये आता काँग्रेसचे 56 उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 15 तर भाजपने 11 उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. राज्यात सध्या नागालँड पीपल्स फ्रंटचे सरकार आहे.

नागालँडमध्‍ये मुख्‍यमंत्री नेफ्यू रिओ, विधानसभा अध्‍यक्ष कियानीली पेसेयी, विरोधी पक्षनेता तोकेहो येप्‍तहोमी, कॉंग्रेस अध्‍यक्ष एस.आय. जमीर आणि गृहमंत्री इमकोंग एल इमचानसारख्‍या दिग्‍गज उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे. राज्‍यात 39 अपक्ष आणि दोन महिला आपले नशीब आजमावणार आहेत. राज्‍यात 2023 मतदान केंद्र असून त्‍यातील 821 संवेदनशील आणि 662 अतिसंवेदनशील केंद्र आहेत.

Email Print
0
Comment