Home » National » Gujarat » Exclusive Photos Of Gautam Adani's Son Karan-Paridhi Reception Party

PHOTOS : उद्योगपती अदानींच्या मुलाच्या विवाहसमारंभाला नेत्यांची मांदियाळी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 16, 2013, 20:17PM IST
1 of 20

21450 कोटी रुपयांचे मालक आणि भारतातील 18 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती गौतम अदानी यांचे चिरंजीव करण व परिधी श्रॉफ यांचा विवाह 13 फेब्रुवारीला झाला. हा विवाह गोव्यात झाला असून लग्नाच्या पार्टीनंतर 15 फेब्रुवारीला पहिले रिसेप्शन अहमदाबादमधील कर्णावती क्लबमध्ये पार पडला.

रिसेप्शन पार्टीत सुमारे 5 ते 6 हजार लोक सहभागी झाले. यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, रविशंकर प्रसाद, अमर सिंग, मुरारी बापु यांच्यासह गुजरातचे मंत्री व काही खास वीवीआयपी पाहुणे यांनी वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले.

करण-परिधीचा दुसरा रिसेप्शन सोहळा 17 फेब्रुवारीला कर्णावती क्लबमध्येच होणार आहे. यात बहुतांशी अदानी ग्रुपमधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात जगभरातील 10 हजार लोक सहभागी होणार आहेत. तसेच दोन्ही परिवारासाठी खास अशा कार्यक्रमाचे आयोजन मुंद्रा टाऊनशिपमध्ये केले आहे.

13 फेब्रुवारीला गोव्यातील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये हा विवाह पार पडला. यात मोजके 500 पाहुणे सहभागी झाले होते. त्यात अनिल-टीना अंबानी, मुकेश-नीता अंबानी, कोकिलाबेन, नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उद्योगपती विजय माल्या, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल, नितीन गडकरी, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असे मोजके नामवंत उपस्थित होते.

करणची पत्नी परिधीचे वडील सिरील श्रॉफ देशातील प्रमुख्य लॉ- फर्मपैकी एक असलेली अमरचंद एंड मंगलदास मध्ये मॅनेजिंग पार्टनर आहेत. परिधी सध्य़ा मुंबईत लॉ चे शिक्षण घेत आहे.

Email Print
0
Comment