जाहिरात
 
 
 

शेतात पिकणार कर्करोगाशी लढणारी बुरशी

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:56(22/02/12)
 
 
 

डेहराडून - एड्स आणि कर्करोगांसारख्या दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त बुरशी शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. डेहराडूनच्या भारतीय वन संशोधन संस्थेच्या (एफआरआय) शास्त्रज्ञांनी गॅनोडर्मा ल्यूसिडियम नावाची बुरशी विकसित केली आहे. दुर्धर आजारावरील उपचाराबरोबरच शेतकरी या बुरशीचे व्यावसायिक उत्पादनही करू शकतात, हा या बुरशीचा सर्वात मोठा फायदा आहे. 

मलेशियातील एका कंपनीने बुरशीपासून तयार केलेली रिशी लीग ची आणि लीग झी ही औषधे बाजारात उपलब्ध आहेत, मात्र भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय वातावरणाला अनुकूल अशी बुरशी विकसित केली आहे. ही बुरशी संपूर्ण उत्तर भारतात पिकवली जाऊ शकते. कर्करोगावर उपचार करणारी ही बुरशी जेव्हा भारतीयांच्या शेतात पिकायला लागेल तेव्हा आम्हाला मलेशियाच्या महागड्या औषधासाठी तिष्ठत बसण्याची आवश्यकताच राहणार नाही. 

फॉरेस्ट पॅथॉलॉजी विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. एस. के. हर्ष यांनी सांगितले की, गॅनोडर्मा ल्यूसिडियम नावाची ही बुरशी पॉपलर किंवा अन्य वनस्पती प्रजातींच्या बुंध्यावर सहजपणे उगवता येऊ शकते.  गॅनोडर्मा बुरशीचा वापर करून नसांशी संबंधित आजारांवर उपचारात मोठी मदत होणार आहे. बुरशीपासून तयार करण्यात आलेली मलेशियाची औषधे भारतीय बाजारात प्रचंड महागड्या किमतीला मिळत आहेत. या बुरशीचा वापर करून ही औषधे भारतात स्वस्तात तयार केली जाऊ शकतात. 

ही बुरशी उगवण्यासाठी परदेशी कंपन्यांना तब्बल 100 दिवसांचा कालावधी लागतो, भारतात पावसाळ्याच्या दिवसात ती 72 ते 80 दिवसांमध्येच उगवली जाऊ शकते. बुरशीची शेती करण्यासाठी एफआरआय शेतक-यांना प्रशिक्षण देणार आहे. मानव जातीसाठी उपयुक्त असलेली ही बुरशी मात्र वनस्पतींच्या प्रजातींसाठी मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे.

गॅनोडर्मा ल्यूसिडियम - बुरशीपासून तयार होणार औषधी. अनेक झाडांवर उगवता येऊ शकते ही बुरशी. या बुरशीपासून तयार करण्यात आलेल्या औषधांमुळे एचआयव्ही, कर्करोग, नसांचे आजार, उच्च किंवा कमी रक्तदाब, पक्षाघात, हृदयविकार, मधुमेह, हेपिटायटिस, अल्सर, दमा आदी दुर्धर आजारांवर उपचार केला जाऊ शकतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
6 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment