Home » National » Delhi » Good News For Women

GOOD NEWS: आता महिलांसाठी स्‍लीपर कोचमध्‍ये सहा बर्थ

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 18:21PM IST
GOOD NEWS: आता महिलांसाठी स्‍लीपर कोचमध्‍ये सहा बर्थ

भारतीय रेल्‍वेने आता आरामदायक (खासकरून महिलांसाठी) प्रवासाला प्राधान्‍य देण्‍याचे ठरवले आहे. ट्रेड युनियनच्‍या संपामुळे आज भलेही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, येणा-या काळात महिला प्रवाशांना रेल्‍वेचा प्रवास सुविधाजनक ठरेल. आता रेल्‍वेतील प्रत्‍येक स्‍लीपर कोचमध्‍ये सहा बर्थ महिलांसाठी आरक्षित असतील. रेल्‍वे बोर्डाकडून सर्व मंडळ कार्यालयांना याबाबत निर्देश देण्‍यात आले आहेत. या बर्थसाठी एकटयाने प्रवास करणा-या किंवा महिलांच्‍या समूहाला प्राधान्‍य दिले जाईल. स्‍लीपर, एसी-3 आणि एसी-2 श्रेणीच्‍या आरक्षणामध्‍ये प्रत्‍येक कोचमध्‍ये दोन लोअर बर्थ ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी, 45 वर्षे किंवा त्‍यापेक्षा अधिक वयाच्‍या महिलांसाठी आणि एकटयाने प्रवास करणा-या गर्भवती महिलांसाठी आरक्षित करण्‍यात येणार आहे.

जनरल कोचमध्‍येही आरक्षित असणार सीट्स

जनरल कोचमध्‍येही महिलांसाठी सीट्स आरक्षित असतील. जेव्‍हा महिला त्‍या सीटवर बसल्‍या नसतील तेव्‍हाच त्‍यावर पुरूष प्रवासी बसू शकेल.

Email Print
0
Comment