Home » National » Delhi » Iit Fees Hikes By 80 Percent

आयआयटी शुल्क 80 टक्के वाढणार!

पंकजकुमार पांडेय | Jan 06, 2013, 03:15AM IST
आयआयटी शुल्क 80 टक्के वाढणार!

नवी दिल्ली- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ट्यूशन फीसमध्ये 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 7 जानेवारी रोजी होणा-या आयआयटी काऊन्सिलच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. तथापि, होतकरूंना सवलत देण्याचा मुद्दाही प्रस्तावात आहे. आयआयटीची सध्याची ट्यूशन फीस 50 हजारात वाढ करून 90 हजार रुपये केली जाऊ शकते. मनुष्यबळ विकास मंत्री एम. पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. मंत्रालयानेही सहमती दर्शवली असली तरी होतकरूंसाठी सवलतीचा फॉर्म्यूला ठेवण्याची अट आहे. काकोडकर समिनीच्या शिफारशींनुसार शुल्कवाढीच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. शुल्कवाढीचा अधिकार आयआयटी बोर्डाला देण्याच्या प्रस्तावावरही या वेळी चर्चा होऊ शकते.

अशी होणार वाढ
०सध्याच्या 50 हजारांऐवजी 90 हजार वार्षिक.
०आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 25 टक्के बी.टेक. स्कॉलरशिप जागा असतील.
०साडेचार लाख रुपये वार्षिक मिळकत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप.
०एससी, एसटी, गरजूंना ट्यूशन फीस माफ.

Email Print
0
Comment