Home » National » Other State » Important Role Of Cctv Footage In Hydrabad Blast

सीसीटीव्‍ही खराब नव्‍हते, फुटेज तपासण्‍याचे काम सुरु - हैदराबाद पोलिस आयुक्त

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 21:14PM IST
1 of 2

हैदराबाद- हैदराबादचे पोलीस आयुक्त अनुराग शर्मा यांनी निष्काळजीपणाचे सर्व आरोप फेटाळले. सीसीटीव्हीच्या तार कापण्यात आल्या होत्या ही बातमी पूर्णपणे चूकीची असल्याचे सांगतानाच याप्रकरणाचा तपास एसआयटी करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. तसेच अतिरेक्यांबाबत ठोस माहिती देणा-याला 10 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्‍हणाले, दिलसुखनगरमधील सीसीटीव्हीच्या तार कापण्यात आल्या नव्हत्या. स्फोट झाल्यांनंतरही रात्री साडे आठ वाजेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. त्‍यांचे फुटेज तपास पथकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. स्फोटांपूर्वी शहरातील 303 पैकी केवळ 23 सीसीटीव्ही कॅमरे बंद होते, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

Email Print
0
Comment