जाहिरात
Home >> National >> Madhya Pradesh >> Jan Chetana Yatra, Lalkrisha Advani Problem In Voice

जन चेतना यात्रा: घशाच्या त्रासामुळे लालकृष्ण अडवाणी परेशान

वृत्तसंस्था | Oct 17, 2011, 02:22AM IST
 
 


होशंगाबाद: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना घशाचा त्रास जाणवत असल्यामुळे आपले भाषण काही मिनिटांतच थांबवावे लागले. ही घटना शनिवारी रात्री येथे घडली.

जनचेतना यात्रेत मोर्चाला मार्गदर्शन करताना अडवाणींना अचानक घशाला त्रास होत असल्याचे जाणवले. तरीही त्यांनी काही मिनिटे उपस्थितांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्रास वाढल्याने त्यांना भाषण थांबवावे लागले.

तत्पूर्वी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलताना त्यांनी सरकारने या प्रश्नी श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी केली. केंद्र सरकार या मुद्यावर फारसे गंभीर दिसत नाही. परदेशी बँकामध्ये असलेला काळा पैसा देशात आणला पाहिजे. त्यासाठी सरकारने पुढील अधिवेशनात श्वेतपत्रिका काढली पाहिजे.

वाजपेयींना मिस करतोय

जनचेतना यात्रेला वाजपेयींचे मार्गदर्शन मिळाले नसल्याची खंत अडवाणी यांनी रविवारी भोपाळमधील जाहीर सभेत व्यक्त केली. अगोदरच्या पाच यात्रांना वाजपेयींचे मार्गदर्शन मिळाले होते. यावेळी ही गोष्ट मी मिस केली आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
2 + 2

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment