जाहिरात
Home >> National >> Madhya Pradesh >> Madya Pradesh Vidhan Sabh President To Lock By Congress Mla

म.प्र. विधानसभा अध्यक्षाला काँग्रेस आमदारांनी कोंडले

दिव्य भास्कर नेटवर्क | Jul 18, 2012, 06:30AM IST
 
 


भोपाळ- मध्य प्रदेशतील काँग्रेस आमदारांनी मंगळवारी विधानसभेत जोरदार हंगामा केला.विधानसभा अध्यक्ष ईश्वरदास रोहाणी यांना सुमारे एक तास त्यांच्या कक्षामध्ये कोंडून ठेवत बाहेर ठिय्या आंदोलन केले.रोहाणी यांच्या ऐवजी सभागृहाचे कामकाज पाहणारे तालिका सभापती ज्ञानसिंह यांनाही काँग्रेस आमदारांनी विरोध केला.

सकाळी 10 वाजता सभागृह सुरु होताच विरोधीपक्ष नेते अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक डझन आमदार विधानसभा अध्यक्षांच्या कक्षाबाहेर धरणे देऊन बसले. सुमारे 10 मिनीटे अध्यक्षांची वाट पाहिल्यानंतर ज्ञानसिंह अध्यक्षांच्या आसनावर बसले.यावेळी काँग्रेस आमदारांनी नियमांवर बोट ठेवित त्यांना विरोध केला. आमदारांनी आसनाकडे धाव घेत टेबलावर ठेवलेली कागदपत्रेही भिरक ावून दिली. यानंतर अध्यक्षांनी कामकाज अनिश्तिच काळासाठी तहकूब के ले. मार्शलांच्या कडेकोट संरक्षणात त्यांना बाहेर जावे लागले. काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित दोन उद्योजक दिलीप सुर्यवंशी आणि सुधीर शर्मा यांच्यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या.या दोन उद्योजकांनी अवैध मार्गाने बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला आहे. या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसला सभागृहात चर्चा हवी होती.परंतु या मुद्यावर सरकारने स्थगन प्रस्ताव स्वीकारला नाही. केंद्रीय संस्थांच्या कारवाईवर सभागृहात चर्चा करता येत नाही असा सरकारचा युक्तिवाद आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
2 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment