Home » National » Delhi » Manmohan Singh May Take Control Of Finance Ministry

EXCLUSIVE: प्रणवदांवर पंतप्रधान नाराज, स्‍वतः घेणार अर्थमंत्रालयाचा ताबा

दीपतोष मजूमदार व सैकत दत्ता | Jun 02, 2012, 12:44PM IST
EXCLUSIVE: प्रणवदांवर पंतप्रधान नाराज, स्‍वतः घेणार अर्थमंत्रालयाचा ताबा

नवी दिल्‍लीः नजीकच्‍या काळात केंद्र सरकारमध्‍ये मोठे फेरबदल होण्‍याची शक्‍यता आहे. प्रणव मुखर्जी यांना राष्‍ट्रपतीपदाची उमेदवारी देण्‍याबाबत कॉंग्रेसमध्‍ये गांभीर्याने विचार सुरु असून स्‍वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच त्‍यासाठी दबाव टाकला आहे. मनमोहन सिंग यांच्‍या या भुमिकेमुळे आश्‍चर्य व्‍यक्त होत आहे. परंतु, मनमोहन सिंग यांची नाराजी यामागील मुख्‍य कारण आहे.

जुलैमध्‍ये राष्‍ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्‍यासाठी उमेदवारी कोणाला द्यावी, कोणाला पाठींबा द्यावा, यासाठी राजकीय पक्षांमध्‍ये खलबते सुरु आहेत. कॉंग्रेसमध्‍ये मात्र वेगळीच खिचडी शिजत आहे. आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्‍यास मुखर्जी अयशस्‍वी ठरल्‍यामुळे पंतप्रधान नाराज आहेत. मुखर्जी यांच्‍या प्रयत्‍नांवर पंतप्रधान समाधानी नाहीत. त्‍यामुळै पंतप्रधानांना स्‍वतः अर्थमंत्रीपदाची सुत्रे हाती घ्‍यायची आहे. त्‍यामुळे प्रणव मुखर्जींना राष्‍ट्रपतीपदासाठी उमेदवारी द्यावी, यासाठी मनमोहन सिंग यांचे प्रयत्‍न सुरु आहेत. आर्थिक सल्‍लागार समितीचे अध्‍यक्ष सी. रंगराजन हे अर्थ मंत्रालयाच्‍या कामासाठी पंतप्रधानांना सहकार्य करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

रंगराजन यांनाच अर्थमंत्री बनविण्‍याचा एक पर्याय पंतप्रधानांपुढे आहे. परंतु, वरिष्‍ठ कॉंग्रेस नेत्‍यांचा त्‍यास विरोध होऊ शकतो. यापुर्वी मनमोहन सिंग यांनी मॉन्‍टेकसिंग आहुलुवालिया यांना अर्थमंत्री बनविण्‍याचा प्रयत्‍न केला होता. परंतु, तो कॉंग्रेसने फेटाळला होता.

Email Print
0
Comment