जाहिरात
 
 
 

इंदूरमध्ये सुग्रास पदार्थ व गाण्यांची ‘जत्रा’

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 00:49(20/02/12)
 
 
 

इंदूर: खवय्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या  इंदूर शहरातील महाराष्ट्र समाज, राजेंद्रनगर व हीरकजयंती रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची जत्रा भरवण्यात आली होती. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भरलेल्या या खाद्यजत्रेत 80 पेक्षा अधिक महाराष्ट्रीय व गुजराती व्यंजनांचा खवय्यांनी आस्वाद घेतला. या निमित्ताने

पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अंजली संत (भाजणीचे थालीपीठ) या पाककृतीस प्रथम, संध्या जोग (फ्राईड इडली) द्वितीय, रेखा जोशी (पुरणपोळी) या पाककृतीस तृतीय पारितोषिक देण्यात आले. ‘सा रे ग म प’  फेम बालगायिका मुग्धा वैशंपायन हिच्या गाण्यांनी या खाद्यजत्रेची लज्जत व खवय्यांचा आनंद द्विगुणीत झाला. मुग्धाने आकांक्षा जाचक हिच्या साथीने एकाहून एक अवीट गीते सादर करून कानसेन खवय्यांना तृप्त केले. इंदूरचे महापौर कृष्णमुरारी मोघे, आमदार जितु जिराती यांच्यासह अनेक मान्यवर य कार्यक्रमाला उपस्थित होते. सुनील धर्माधिकारी, प्रशांत बडवे, मिलिंद बुगदे व धर्मेंद्र उर्ध्वरेषे यांनी या खाद्यजत्रेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
3 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment