Home » National » Gujarat » Monthe Income 25 Thousand; Then Take Liquor Perimit In Gujrat

मासिक उत्पन्न 25 हजारांवर; तरच मिळेल गुजरातेत दारू

सरफराज शेख | Feb 23, 2013, 06:30AM IST
मासिक उत्पन्न 25 हजारांवर; तरच मिळेल गुजरातेत दारू

अहमदाबाद - गुजरातेत ‘लिकर परमिट’ देण्याच्या अटी सरकारने बदलल्या असून 25 हजारांवर मासिक उत्पन्न असलेले लोकच आता मद्यपान करू शकतील. यामुळे परवानाधारकांची संख्या 75 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
गृहविभागाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. राज्यात आजवर चार हजार मासिक उत्पन्न असलेल्यांना मद्यपानाचा परवाना होता. नव्या नियमानुसार 5 एकर जमीन असलेली व्यक्तीही असा परवाना मिळवू शकेल. हा परवाना मिळवताना 5 वर्षांचे आयकर रिटर्न भरल्याचा पुरावा बंधनकारक असेल. आरोग्याच्या कारणाचा आधार घेऊन राज्यात परवानाधारकास दोन युनिट दारू देण्याची तरतूद आहे.

Email Print
0
Comment