Home » National » Delhi » Pregnant Women Gang Raped

बंदुकीचा धाक दाखवून गरोदर महिलेवर सामुहिक बलात्‍कार

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 23, 2013, 11:00AM IST
बंदुकीचा धाक दाखवून गरोदर महिलेवर सामुहिक बलात्‍कार

नवी दिल्‍ली- राजधानी दिल्‍लीतील महिलांवरील अत्‍याचाराचे सत्र अजूनही संपताना दिसत नाही. दिल्‍लीपासून जवळ असलेल्‍या ग्रेटर नोएडा येथे एका गरोदर महिलेवर सामुहिक बलात्‍कार झाल्याचे उघड झाले आहे. दोन नराधमांनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्‍कार केल्‍याचे पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

रबूपुरा येथील फलेदा भागात अजित (बदलले नाव) मंगळवारी कामानिमित्त घरातून बाहेर गेला होता. त्‍याची पत्‍नी आणि आई-वडील हे तिघेच घरी होते. रात्री पत्‍नी एका खोलीत एकटी झोपली होती. आणि त्‍याचे आई-वडील दुस-या खोलीत झोपले होते. त्‍याचवेळी दोन युवक जबरदस्‍तीने घरात घुसून त्‍या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्‍यावर जबरदस्‍ती केली. त्‍याचबरोबर तिने याबाबत कोणाला सांगितल्‍यास त्‍याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकीही दिली. मात्र, गडबडीत घरातून पळून जाताना एका आरोपीची चप्‍पल तिथेच राहिली.

घाबरलेल्‍या पीडित महिलेने सासू-सास-यांना काही न सांगता आपल्‍या पतीला फोन करून आपबिती कथन केली. पीडित महिलेचा पती जेव्‍हा रबूपुरा पोलिस ठाण्‍यात तक्रार देण्‍यासाठी गेला तेव्‍हा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्‍याऐवजी तडजोड करण्‍यासाठी पीडितेच्या कुटूंबियांवर दबाव टाकला आहे.

  
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
6 + 7

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment