Home » National » Other State » Prime Minister Manmohan Singh Visits Hospitals, Meets Injured In Thursday's Hyderabad Blasts

'लष्‍कर'ने दिली हैदराबादमध्‍ये आणखी एक स्‍फोट घडविण्‍याची धमकी

वृत्तसंस्‍था | Feb 24, 2013, 18:11PM IST
1 of 2

हैदराबाद- हैदराबाद येथे दिलसुखनगर परिसरात झालेल्‍या दोन बॉम्‍बस्‍फोटानंतर आणखी एक स्‍फोट घडवून आणण्‍याची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. ही धमकी लष्‍कर-ए-तोयबाने दिली असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष जी. किशन रेड्डी यांना तसे पत्र मिळले आहे. हैदराबादमधील बेगम बाजाराला लक्ष्‍य करण्‍यात येणार असल्‍याचा इशारा पत्रातून देण्‍यात आल्‍याचे रेड्डी यांनी सांगितले. पत्राची दखल घेऊन सुरक्षा वाढविण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रविवारी हैदराबादमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट झालेल्‍या घटनास्‍थळाची पाहणी करुन जखमींची तसेच मृतांच्‍या नातेवाईकांची भेट घेऊन त्‍यांचे सांत्‍वन केले.

Email Print
0
Comment