बदायूं - माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी चिदर्पिता आता परत साध्वी बनण्याच्या तयारीत आहे. चिदर्पिताचा आरोप आहे की, तिचे पती बी.पी.गौतम तिला मारहाण करत असतात आणि तिचे कौटूंबिक आयुष्य पूर्णपणे उदध्वस्त झाले आहे.
चिदर्पिताने म्हटले आहे की, 'स्वामीजींचा (चिन्मयानंद) मला फोन आला होता. ते म्हणाले, तु ज्या परिस्थितीत असशील तशी ये. तुझ्यासाठी आश्रमाचे दरवाजे खुले आहेत.'
चिदर्पिताने म्हटले आहे, मी सध्या संभ्रमात आहे. काय करावे हे मला सुचत नाही आहे. मात्र, या नरकयातनांपेक्षा ते नक्कीच चांगले आहेत, ज्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली.
(छायचित्र - चिदर्पिताचे संग्रहित छायाचित्र. )