आसाराम बापू यांनी दिल्ली गँगरेपमधील पीडित मुलीलाच धरले दोषी!
दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 09:36AM IST

नवी दिल्ली- संत आसाराम बापू यांनी दिल्ली सामूहिक अत्याचार प्रकरण दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. मात्र, या घटनेला पीडित मुलगी व संबंधित सहा आरोपींही दोषी असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
बापू आसाराम यांनी म्हटले आहे की, मी स्वत: त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना शोकसंदेश पाठवला आहे. तसेच आपण एकटे समजू नये संपूर्ण देश तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. जी मुलगी गेली ती घरातील एकटीच पैसे कमवीत होती. मात्र आता तिच्या कुटुंबियांना आर्थिक समस्या येऊ शकतात. ते म्हणाले, ‘खरं तर या घटनेला फक्त ते पाच-सहा दारुडेच जबाबदार नाहीत. टाळी दोन्ही हातांनी वाजत नाही. त्या मुलीने कोणाला दादा-भाऊ म्हणत पाया पडली असती तर कदाचित वाचलीही असती. किमान स्वत:ला वाचवायचा प्रयत्न तरी तिने करायला हवा.
बलात्कारविरोधी कायदा करताना तो अधिक कडक करु नये, कारण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असेही आसाराम बापू यांनी सांगितले.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





