नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची अवैध खाणकामप्रकरणी लोकायुक्तांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कृष्णा यांना दिलासा मिळाला आहे. कृष्णावर कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात अवैध खाणकाम झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तसेच कर्नाटकच्या लोकायुक्तांनी कृष्णा यांच्या काळातील खाणकाम चौकशीचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या विरोधात कृष्णा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टोने स्थगिती आणली त्यामुळे कृष्णा यांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटकच्या लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाला आम्ही स्थगिती देत आहोत, असे सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने आज जाहीर केले.