Home » National » Other State » Sonia Gandhi And Narendra Modi Kumbh Visit Cancelled

नरेंद्र मोदी, सोनिया गांधींचा महाकुंभ दौरा रद्द

वृत्तसंस्‍था | Feb 10, 2013, 15:38PM IST
नरेंद्र मोदी, सोनिया गांधींचा महाकुंभ दौरा रद्द

अलाहाबाद- उत्तर प्रदेश सरकारने पुरेसी सुरक्षा पुरविण्‍यात असमर्थता व्‍यक्त केल्‍यानंतर कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांचा महाकुंभ दौरा रद्द करण्‍यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अशा प्रकारचा निर्णय कळविल्‍यानंतर कॉंग्रेसने नाराजी व्‍यक्त केली आहे.

सोनिया गांधी येत्‍या काही दिवसांमध्‍ये महाकुंभामध्‍ये हजेरी लावणार होत्‍या. त्‍यांच्‍या दौ-यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतिसाद अपेक्षित होता. परंतु, समाजवादी पार्टीच्‍या सरकारने अतिशय विलंब केला. अखेर सोनियांना पुरेसी सुरक्षा पुरविण्‍यास असमर्थ असल्‍याचे सरकारने कळविले. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते किशोर वर्शने यांनी समाजवादी पार्टीवर सोनिया गांधींनी कुंभ मेळ्यात हजेरी लावू नये, यासाठी हे प्रयत्‍न केल्‍याचा आरोप केला. ते म्‍हणाले, 2001 मध्‍ये तत्‍कालीन भाजप सरकारने सोनिया गांधींना रोखण्‍यासाठी अनेक प्रयत्‍न केले होते. तरीही सोनियांनी कुंभ मेळ्यात हजेरी लावून शाही स्‍नान केले होते. परंतु, सध्‍या देशातील परिस्थिती पाहता सोनियांनी यावेळी दौरा रद्द करण्‍याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांचाही दौरा नियोजित आहे. परंतु, त्‍यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्‍यात आलेला नाही, असेही त्‍यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी त्रिपुरा दौराही रद्द केला आहे. यामागे प्रकृती अस्‍वस्‍थ असल्‍याचे कारण सांगण्‍यात आले आहे. त्रिपुरामध्‍ये या महिन्‍यात विधानसभा निवडणुका आहेत.

दरम्‍यान, गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही महाकुंभ दौरा रद्द झाला आहे. 12 फेब्रुवारी रोजी मोदी महाकुंभ मेळ्याला भेट देणार होते. परंतु, कुंभ मेळ्यात होत असलेल्‍या राजकीय हालचालींबाबत सरकारने नाराजी व्‍यक्त केली होती. त्‍यामुळे मोदींचा दौरा रद्द होण्‍यामागे राजकीय कारण असल्‍याची चर्चा आहे.

Email Print
0
Comment