विशेष भाष्य़ : या विषवल्लीचे निर्मूलन का नाही?
इंदूर - जानेवारी 1978 : गजबजलेला कोठारी बाजार. कोप-यावरील मोठी पानटपरी. एक लहान मुलगा पानवाल्याला पाहून वारंवार विचारत होता की, त्या काकांच्या गालावर मधमाशांचे एवढे मोठे मोहोळ कसे काय आले? विचारा ना! त्या मुलाला कसेबसे समजावून, रागावून त्याचे वडील घेऊन गेले.
मंगळूर. मे 1960 : भर बाजारात एकावर तीन गुंडांचा हल्ला. लुटण्याचा प्रयत्न. त्या उंच, तगड्या माणसाशी झटापट करताना ते तीन गुंड निष्प्रभ ठरत असतानाच त्या माणसाला दम लागला. तो खिशातून तंबाखू काढण्याचा प्रयत्न करीत होता आणि वरून मार खात होता. शेवटी त्याने तंबाखू खाल्लीच. रक्तबंबाळ. हात मोडला, डोके फुटले. श्वासही मंदावला. पण तंबाखूची तलफ काही गेली नाही. लोकांचा जीव गुदमरत होता. पण तो मरतानाही या विषवल्लीचा विरह सहन करू शकला नाही.
दक्षिण दिल्ली. 1989 : निवडणुकीचे वातावरण. पंतप्रधानांचा जवळचा उमेदवार. परीटघडीच्या कपड्यात प्रचार करीत होते. कार्यकर्त्यांनी अनेकदा समजावून सांगितले, पान मसाल्याचा डबा हातात ठेवू नका. मतदार नाराजी व्यक्त करताहेत. पराभव झाला, करिअर नष्ट झाले तरी पान मसाला न सोडण्याचा निर्धार. झालेही तसेच.
खरोखर, लोक सोडत नाहीत. कित्येक वर्षांपासून ही किळसवाणी, धीम्या पावलांनी मृत्यूकडे वाटचाल सुरूच आहे. करिअरच काय, पण घरही उजाड झाले तरी पर्वा नाही. तोंडाला मधमाशांच्या पोळ्याचे रूप आले तरी चालेल. रस्त्यावर मृत्यूशी झटापट करावी लागली तरी तंबाखू खायचीच. कुणीही, कधीही सोडणार नाही. हे व्यसन तर संपवावेच लागेल. प्लेगपेक्षाही जास्त भयंकर.
दैनिक भास्कर समूहाची हीच विचारसरणी आहे. यामुळेच केंद्र सरकार ने तंबाखूविरोधी हालचाली सुरूही केल्या नव्हत्या तेव्हा भास्करचे प्रतिनिधी व संपादकांनी रा ष्ट्र व्यापी मोहीम राबवली. शेवटी मध्य प्रदेशात गुटखाबंदी लागू झाली. नंतर ‘भास्कर’ने इतर राज्यांतही सरकारवर जनमताचा रेटा वाढवला आणि मग एकापाठोपाठ एक इतर राज्यांमध्येही गुटख्यावरील बंदी आदेशांतून वाचकांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येत गेला.कोट्यवधी वाचकांनी भास्करला देशात सर्वात मोठा वृत्तपत्र समूह बनवले आहे.सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे सशक्त माध्यम होण्याचा संकल्प भास्करने केला आहे. राजस्थानमध्ये रात्री 8 नंतर दारूच्या विक्रीवर बंदी घालण्याची मोहीम याच संकल्पाची सुरुवात होती.
भोपाळ गॅस गळतीमुळे 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात या घटनेला रस्त्यावरील किरकोळ अपघाताप्रमाणे गुन्हा मानण्यात आल्यानंतर कायद्याचे कलम बदलण्याच्या रा ष्ट्र ीय मोहिमेला सर्वात जास्त यश मिळाले. रिचर्ड बाक यांची कालातीत कादंबरी ‘जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल’मध्ये अतिशय समर्पकपणे म्हटले आहे की, काम सगळेच करतात, ध्येय काही निवडक लोकच ठरवतात. डास उडतात, पण उड्डाण करावे, असे त्यांचे ध्येय नसते. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा उद्देश सार्थकी लावल्याबद्दल ‘भास्कर’ वाचकांचा आभारी आहे, नेहमीच राहील.





