Home » National » Other State » Suryanelli Rape Case In Special Court

सूर्यनेल्ली खटला विशेष खंडपीठात चालणार

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 08:21AM IST
सूर्यनेल्ली खटला विशेष खंडपीठात चालणार

कोची - सतरा वर्षांपूर्वीच्या सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने नवीन खंडपीठाची स्थापना केली आहे. न्यायमूर्ती के. टी. शंकरन आणि एम. एल. फ्रान्सिस यांच्या अध्यक्षतेखाली हे पीठ चालणार आहे. नवीन पीठासमोर काही आरोपींवरील खटल्याची सुनावणी होईल. त्या अगोदर विशेष न्यायालयाने महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणात खटले चालवण्यात आले. विशेष पीठाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती टी. आर. रामचंद्रन नायर यांच्याकडे होते. या प्रकरणात 2005 मध्ये उच्च न्यायालयाने 35 आरोपींची सुटका तर तिसरा आरोपी धर्मराजनची जन्मठेप कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. 1996 मध्ये सूर्यनेल्ली येथील शालेय मुलीचे अपहरण करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. पीडित मुलीकडून शुक्रवारी राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Email Print
0
Comment