सुरतमधील भीषण आगीत इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या दोन कर्मचा-यांचा मृत्यू
वृत्तसंस्था
| Jan 06, 2013, 15:15PM IST

सुरत- इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या हजिरा टर्मिनल येथे असलेल्या पेट्रोलच्या साठ्याला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही इंडियन ऑईलचे कर्मचारी आहेत. त्यांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. आग आटोक्यात आली आहे.
इंडियन ऑईल कार्पोरेशन (आयओसी) कंपनीच्या या साठ्याला शनिवारी आग लागली होती. सुमारे 24 तासांच्या प्रयत्नांनंतर आज ही आग आटोक्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 150 बंब तैनात करण्यात आले होते. परंतु, तेलसाठा असल्याने आग भडकत होती. या अग्नितांडवात 50 कोटींचं 100 लाख लिटर तेल जळाल्याची शक्यता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. आग लागण्याआधी चार नंबरच्या टँकमध्ये स्फोट झाल्याचा दावा प्रत्यक्ष्यदर्शींनी केला आहे.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






