Home » Jeevan Mantra » Yog » -Thinness-Will-Be-Far-From-Surprising-Ways

अशक्‍तपणा दूर करायचा आहे? करा हे सोपे उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 12, 2012, 12:35PM IST
अशक्‍तपणा दूर करायचा आहे? करा हे सोपे उपाय

लठ्ठपणाबरोबर दु‍बळेपणानेही अनेक आजारांना निमंत्रण मिळते. दुबळेपणामुळे पचनशक्‍ती मंदावते आणि पाचकद्रव्‍याची निर्मितीही कमी प्रमाणात होते. त्‍यामुळे अशक्‍तपणा येतो. अशक्‍तपणा दूर करण्‍यासाठी काही सोपे उपाय सांगण्‍यात आले आहेत.

- अशक्‍तपणा असलेल्‍या रूग्‍णाने जेवणात दूध, तूपाचा वापर करावा.

- भरपूर झोप घ्‍यावी.

- गव्‍हाची चपाती, मूगाची दाळ, पालक, पपई, भोपळा, मेथी, पडवळ, पान कोबी, फूल कोबी इत्‍यादीचे मोठया प्रमाणात सेवन करावे.

- रोज डाळिंब, सफरचंद, मोसंबी खावे किंवा त्‍यांचा रस घ्‍यावा. सुका मेव्‍यामध्‍ये अंजिर, अक्रोड, बदाम, पिस्‍ता, काजू, मनुक्‍याचे नियमित सेवन करावे.

- झोपताना कोमट दुधात एक चमचा शुद्ध तूप घालून ते प्‍यावे. त्‍याचबरोबर जोपर्यंत याचा फायदा होत नाही तोपर्यंत एक चमचा अश्‍वगंधा चूर्णाचे सेवन करावे.

- लवणभास्‍कर चूर्ण, हिंग्‍वाष्‍टक चूर्ण, अग्निकुमार रस, आनंदभैरव रस, लोकनाथ रस, संजीवनी वटी, कुमारी आसव, द्राक्षासव, लोहासव, द्राक्षारिष्‍ट , अश्‍वगंधारिष्‍ट, सप्‍तामृत, लोह, आरोग्‍यवर्धिनी वटी, च्‍यवनप्राश, मुसलीपाक, बदाम पाक, अश्‍वगंधा पाक, शतावरी पाक, लोहभस्‍म, शंख भस्‍म, सुवर्ण भस्‍म इत्‍यादींचे वैद्यांच्‍या मार्गदर्शनाने सेवन करावे.

Email Print
0
Comment