Home » Jeevan Mantra » Dharm » Kundalini Shakti Dance Form By Isha Sharvani

ही छायाचित्रे पाहताच दूर होईल थकवा, पोहोचाल दुसर्‍या जगात...!

दिव्य मराठी | Oct 17, 2013, 16:43PM IST
1 of 31

कुंडलिनी शक्तीचे नाव सर्वांनीच ऐकले असेल आणि आता बरेच लोक माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे असे सांगतात, परंतु हे सत्य आहे का? हे प्रश्न यांनी स्वतःच्याच मनाला विचारवा. सत्य सांगायचे झाल्यास कुंडलिनी शक्ती जागृत झालेल्या मनुष्याला या संसारात जगणे कठीण होऊन जाते, कारण ही सामान्य घटना नाही.

संयम आणि सम्यक नियमांचे पालन करीत तासंतास ध्यान केल्याने हळूहळू कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागते आणि जेव्हा ही जागृत होते, तेव्हा व्यक्ती पूर्वीसारखा राहत नाही. तो दिव्य पुरुष बनतो. कुंडलिनी एक दिव्य शक्ती आहे, जी सापाप्रमाणे साडेतीन फेरे घेऊन शरीराच्या सर्वात खालील मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे. जोपर्यंत ही खालील चक्रात आहे तोपर्यंत व्यक्ती संसारिक विषयांकडे धावत राहतो. परंतु ही शक्ती जागृत झाल्यानंतर दिव्य अनुभव होतो.

कुंडलिनी जागृत करण्याच्या काही खास क्रिया आम्ही तुम्हाला फोटोंच्या माध्यमातून दाखवत आहोत. हा एक डान्स फॉर्म असून आतापर्यंत जगभरातील ३० देशांमध्ये हा सादर करण्यात आला आहे. जवळपास २५ आंतरराष्ट्रीय डान्स फेस्टिवलमध्ये याला स्थान प्राप्त झाले आहे. दिल्लीतील कामानी ऑडीटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये हा परफॉर्मेंस प्रसिद्ध डान्सर ईशा शरवानीने सादर केला.

कुंडलिनी जागृतीचा प्रारंभिक अनुभव : कुंडलिनी शक्ती जागृत होत असताना व्यक्तीला देव-देवतांचे दर्शन घडू लागते. ॐ किंवा हूं हूं अशा गर्जना ऐकू येतात. डोळ्यासमोर पहिल्यांदा काळा, नंतर पिवळा आणि शेवटी निळा रंग दिसू लागतो.

अशा व्यक्तीला आपले शरीर हवेवर एखाद्या फुग्याप्रमाणे हलके वाटू लागते. डोक्यावरील शेंडीच्या ठिकाणी म्हणजे सहस्रार चक्रावर असंख्य मुंग्या चालल्यासारखा अनुभव होतो आणि असे जाणवते की, काहीतरी आहे जे वरती जाण्याचा प्रयत्न करीत आहे. मणक्यामध्ये कंपन होऊ लागते. अशा प्रकारचे प्रारंभिक अनुभव होऊ लागतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कुंडलिनी शक्ती जागृत करणाऱ्या क्रियांचे खास फोटो....
(फोटोः भूपिंदर सिंह)

Email Print
0
Comment