भारतातील घराघरांतून तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या उत्पत्तीविषयी पुराणांत आख्यायिका आहे. देव आणि दानव समुद्रमंथन करीत होते. मंथनातून अमृतकुंभ बाहेर आले. या कुंभातून अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली. तुळशीत असलेल्या औषधी गुणांमुळे भारतात या वनस्पतीची पूजा केली जाते. आज आम्ही या ठिकाणी तुळसीबद्दल महत्त्वाची माहिती देत आहोत.