जाहिरात
 
 
 

मन:शांती मिळविण्यासाठी टाळाव्यात या दोन गोष्‍टी!

 
Source: पं.विजयशंकर मेहता   |   Last Updated 16:43(02/02/12)
 
 
 

दुर्योधन आणि रावण यांच्या व्यक्तिमत्त्वात दोन महत्त्वाचे अवगुण होते. ते म्हणजे अहंकार आणि क्रोध. या दोन अवगुणांमुळेच त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धी मातीत मिसळल्या गेल्या होत्या. आणि याच्या कारणामुळे त्यांच्यावर मृत्यूने विजय मिळवला होता.

अहंकार आणि क्रोध यावर ज्यांचे नियंत्रण नसते त्यांचे मन नेहमी अशांत असते. सोन्याच्या लंकेवर राज्य कराणारा रावणाला देवांना पराजीत केल्याचा रावणाला मोठा गर्व आला होता. भोलेनाथ शिव शंकराला प्रसन्न करून त्याने अमरत्व प्राप्त केले होते. त्यामुळे रावण अहंकारी बनला होता. त्याच्या विरोधात कोणी बोललेले त्याला सहन होत नव्हते. त्यांच्या तडपशाह‍ीमुळे सगळे त्यांला नतमस्तक होत असत. यामुळे त्यांच्या क्रोधाला खतपाणी घातले जात होते. सत्य बोलणारे त्याला आपले शत्रू वाटायचे. सीतेचे अपहरण केल्यानंतर त्याला विरोध करणारे विभीषण आणि माल्यवंत यांना आपल्या राज्यातून घालवून दिले होते.

एकूणात त्याच्या नसांनसात अहंकार आणि क्रोध भरला होता.

दुर्योधनाचे व्यक्तिमत्त्व याशिवाय वेगळे नव्हते. हस्तिनापुराच्या राजसिंहासनावर स्वत: विराजमान होण्याची त्यांची इच्छा होती. परंतु युधिष्ठिरसह पाच पांडव अज्ञातवासातून परतल्याने आपले राजपाठ जाते की काय, अशी भीतीही त्याला वाटू लागली होती. युधिष्ठिर हे दुर्योधन याच्यापेक्षा वय आणि गुणांनी श्रेष्ठ होते. या घटनेमुळेच त्याच्या मनात क्रोड उत्पन्न होत होता. आणि याच क्रोधामुळे शेवटी दुर्योधनाचा शेवट केला. रावण आणि दुर्योधन यांनी जर अहंकार आणि क्रोध सोडून दिला असता तर एकढे मोठे युद्ध झाले नसते आणि झालेली हानीही टाळता आली असती.

त्यामुळे आपणही आपल्या जीवनातून रावणरुपी अहंकार आणि दुर्योधनरुपी क्रोध काढून टाकला प्रयत्न करावा.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
8 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment