जाहिरात
 
 
 

मनुष्‍याने कधीही असे करू नये, कारण...

 
Source: धर्म डेस्क. उज्जैन   |   Last Updated 14:31(07/02/12)
 
 
 

कुटुंबातील व्‍यक्‍तींशी आणि समाजाशी आपले वागणे कसे असले पाहिजे, इतर लोकांशी कसे राहिले पाहिजे, त्‍यांच्‍याशी कशाप्रकारचे नातेसंबंध असले पाहिजेत? यासंबंधी आचार्य चाणक्‍य म्‍हणतात की-

यत्रोदकस्तत्र वसन्ति हंसा

स्तथैव शुष्कं परिवर्जयन्ति।

न हंसतुल्येन नरेण भाव्यं

पुनस्त्यजन्त: पुनराश्रयन्त:।।

जिथे पाणी असते, तिथेच हंस असतो आणि जिथे पाणी नसते ती जागा तो लगेच सोडून देतो. आपला स्‍वभाव हंसासारखा असू नये.

आचार्य चाणक्‍य म्‍हणतात, आपण कधीही आपल्‍या मित्रांची आणि नातेवाईकांची साथ सोडली नाही पाहिजे. ज्‍याप्रमाणे हंस पाणी संपलेल्‍या तलावाला सोडतो. तसा मनुष्‍याचा स्‍वभाव नसला पाहिजे. अनेक वर्षांपासून राहत असूनही तलावातले पाणी संपले म्‍हणून हंस सोडून जातो. पावसाळयात तिथे पाणी आल्‍यानंतरच हंस परत येतो. आपला स्‍वभाव तसा नसावा. मित्रांच्‍या सुखदुखा:त, प्रत्‍येक परिस्थितीत आपण त्‍यांची साथ दिली पाहिजे. एकदा त्‍याच्‍यांशी संबंध निर्माण केल्‍यानंतर ते कायम निभावले पाहिजे. हंसासारखा आपला स्‍वभाव स्‍वार्थी असू नये.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment