जाहिरात
 
 
 

जसे कर्म केले जातात फळही तसेच मिळते

 
Source: दिव्य मराठी   |   Last Updated 15:27(14/12/11)
 
 
 

जत्रेला खूप गर्दी होती. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजली होती आणि खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. हलवाई शोभाराम याने जत्रेत मिठाईचे दुकान लावले होते. त्याच्या दुकानावर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. तेवढय़ात शोभारामच्या दुकानाजवळ एका गरीब माणसाने वांती केल्याचे शेजारी राहणार्‍या सतीशने पाहिले. दुकानाजवळच घाण केल्यामुळे शोभाराम त्या माणसावर नाराज झाला. वांती केलेली जागा स्वच्छ करण्यासाठी शोभाराम दडपण टाकत होता. त्या गरीब माणसाची स्वस्त व निकृष्ट दर्जाची मिठाई सेवन केल्यानेच ही दुर्दशा झाली असल्याचे सतीशच्या लक्षात आले. पैसा कमावण्याच्या लोभापायी शोभाराम लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे पाहून सतीशला वाईट वाटले. काही वेळाने शोभारामचा भाऊ मुकेश मोटारसायकल घेऊन तिथे आला आणि म्हणाला, ‘भाऊ, बंटीची प्रकृती खूपच बिघडली आहे. त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.’ बंटी शोभारामचा धाकटा मुलगा होता. तो अनेक दिवसांपासून आजारी होता. ते ऐकून शोभारामला चिंता वाटू लागली. मुकेश म्हणाला, ‘भाऊ, वाईट वाटून घेऊ नकोस. आतापर्यंत तू पैसा वाचवण्याच्या नादात बंटीवर भोंदूबाबांकडून उपचार करवून घेतले, त्यामुळेच त्याची प्रकृती बिघडली. आयुष्य अनमोल आहे. केवळ पैशांसाठी आयुष्याशी खेळणे चांगले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, बंटीला चांगल्या डॉक्टरांना दाखव आणि त्याचे आयुष्य वाचव.’ सतीशनेही शोभारामजवळ जाऊन त्याचे सांत्वन केले आणि हेच समजावून सांगितले. शोभाराम म्हणाला, ‘तुमचे म्हणणे बरोबर आहे. कदाचित हे माझ्या कर्माचेच फळ असावे.’

तात्पर्य  - वैयक्तिक फायदा किंवा लोभापायी कधीही दुसर्‍याचे नुकसान करू नये, कारण जसे कर्म केले जातात, फळही तसेच मिळते.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
3 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment