मिथून लग्न कुंडलीतील तिस-या आणि चौथ्या स्थानी जर मंगळ असेल तर त्या व्यक्तिच्या जीवनावर काय प्रभाव पडतो हे जाणून घेऊ या.
मिथून लग्नाच्या कुंडलीत तृतीय स्थानी मंगळ असेल तर...
ज्या लोकांच्या कुंडलीत मिथून आहे आणि त्यांच्या तृतीय स्थानी मंगळ असेल तर त्या व्यक्तीला भाऊ-बहिणीकडून मदत मिळत नाही. कुंडलीतील तिसरे स्थान पराक्रम आणि भाऊ-बहिणींशी संबंधित असते. या स्थानाचा राशी स्वामी सूर्य असतो. सूर्याच्या या राशीमध्ये मंगळ असेल तर अडचणीचा सामना केल्यानंतरच यश मिळते. या लोकांना सरकारी कामातून धन प्राप्ती होते. मान-सन्मान मिळतो. यश मिळते. शारीरिक आणि मानसिक परिश्रम केल्यानंतरच यश प्राप्त होते.
मिथून लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानी मंगळ असेल तर...
जर एखाद्याच्या कुंडलीत मिथून लग्न आणि त्याच्या चतुर्थ स्थानी मंगळ असेल तर त्या व्यक्तिस मोठया कष्टाने जमीन किंवा घर घेता येते. या लग्नातील चतुर्थ स्थानी कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुधाच्या या राशीमध्ये मंगळ असल्यामुळे त्या व्यक्तिस आईकडून काही अडचणी येऊ शकतात. पण त्यानंतर सुखप्राप्ती होते. या लोकांची प्रगती कठीण परिश्रमानंतर होते.