FACT: नागाला दुध पाजू नये, कारण की...

नेहमी असे पाहण्यात येते की, मनुष्य आपल्या फायद्यासाठी निसर्गाच्या नियमांकडे कानाडोळा करीत आला आहे. त्याचा घातक परिणाम मनुष्याच्या जीवनावरच होतो. खासकरून जेंव्हा देव-धर्म, श्रद्धा, आस्था, धार्मिक परंपरा या गोष्टींशी संबंधित एखादी गोष्ट असेल तर मनुष्य त्याला विरोध करू शकत नाही. जाणून घ्या अशाच एका धर्म प्रथेविषयी.....
हिंदू धर्मात नागपंचमीचा उत्सव धार्मिक दृष्टीकोनातून नागाची पूजा करून सुख, शांती, आणि समृद्धी प्रदान करणारा मानला जातो. ही पवित्र परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. परंतु काळांतराने या परंपरेत नागाला दुध पाजण्याची प्रथा सुरु झाली.
लोक मान्यतेनुसार नागाची पूजा खूप मंगलकारी मानली जाते. त्यामुळे या उत्सवात मोठ्या प्रमाणात नागांना पकडले जाते. श्रद्धाळू त्यांना दुध पाजतात. परंतु या प्रथेमागचे खरे कारण समजले तर, हे लक्षात येईल की पुण्य भेटण्याच्या उद्देशाने पार पाडली जाणारी ही प्रथा आपल्यासाठी शापाचे कारण बनू शकते.
साप ही निसर्गाच्या अन्नसाखळीची महत्वाची कडी आहे. शेतातील कीटक बेडूक खातात. तसेच धान्यबियाणे उंदीर फस्त करतात. बेडूक व उंदीर हे सापाचे अन्न. साप हा मांसाहारी प्राणी आहे. सापाची शरीररचना आणि त्याचे अंग मांसाहार पचन करण्याची क्षमता ठेवतात. परंतु नागपंचमीला धार्मिक पुण्याच्या लोभाने सापाला दुध पाजल्यामुळे या निसर्गमित्राच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाचे पचन न होणे, किंवा सापाच्या वास घेण्याचे आणि श्वास घेण्याचे प्रमुख अंग नाकाच्या छिद्रात दुध गेल्यामुळे सापाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि या कारणामुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
अशा पद्धतीने पुण्य प्राप्त करण्याच्या क्षणी आपल्याकडून अनावधानाने नागाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. ज्याला आपण देवता मानून सुख आणि समृद्धीसाठी कृपा मागतो त्याच्याच मृत्यूला आपण कारणीभूत ठरतो. त्यामुळे धार्मिक कर्मात जीव हत्येच्या दोषापासून वाचण्यासाठी नागपंचमीला नागाची पूजा करताना दुधाचे काही थेंब फक्त नागावर शिंपडावे. जे पर्यावरणासाठी आणि तुमच्या पुण्य प्राप्तीसाठी फायदेशीर आहे.
आणखी एक उपाय - शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा. महादेव नागाचे देवात आहेत. महादेव नागाल आपल्या शरीरावर धारण करतात. त्यामुळे महादेवाला केलेला अभिषेक नागाच्या पुजेसमान आहे.







