जाहिरात
 
 
 

भाग्यकारक, बुद्धी आणि विवेकाचा देव

 
Source: पं. विजयशंकर मेहता   |   Last Updated 16:09(13/10/11)
 
 
 

बुद्धीला वारंवार चालना द्यावी लागते. जे लोक हे करतात ते विद्वानांमध्ये गणले जातात. बाहेरची दुनियादारी जिंकण्यासाठी आणि संसाररूपी जीवन समजण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. बुद्धू आणि बुद्ध हे शब्द जवळपासच आहेत. बुद्ध होणे एक स्थिती आहे. ज्याला बोध झाला तो बुद्ध आहे आणि यात जो एकदा यशस्वी झाला त्याला बाहेरची दुनिया व्यर्थ वाटायला लागते. अशा नि:स्पृह लोकांना संसाराने बुद्ध म्हटले आहे. गणपती बुद्धीबरोबरच विवेकाचा देव आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. विवेक नसेल तर बुद्धी घातक होऊ शकते. विवेक तिला संतुलित ठेवतो. बुद्धीच्या जोडीला विवेक असेल तर गांधींसारखे लोक जन्मास येतात. एक व्हॉइसराय जेव्हा गांधीजींना भेटण्यास चालले होते तेव्हा त्यांना इंग्लडच्या पंतप्रधानांनी एक गोष्ट सांगितली होती. सावध राहा, गांधींच्या डोळय़ात बघू नका. माहीत नाही काय जादू आहे त्यांच्या डोळय़ात. ती जादू होती बुद्धी आणि विवेकाची. बुद्धी जेव्हा शोध घेते तेव्हा विवेक तिला स्वीकृती आणि अस्वीकृतीची समज देतो. बुद्धी जेव्हा थकते तेव्हा विवेक तिला उत्तेजित करतो. बुद्धीसमोर जेव्हा अंधार येतो त्या वेळेला विवेक प्रकाश देतो. बुद्धी वजनदार बनवते तर विवेक व्यक्तित्वाला हलके बनवतो. गणपती याचेच प्रतीक आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 6

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment