जाहिरात
 
 
 

जुनी दुखणी अधिक गुंतागुतीची करण्यास तणावच कारणीभूत

 
Source: डीबी स्टार . नेटवर्क   |   Last Updated 12:54(21/02/12)
 
 
 

तज्ज्ञांच्या मते नवनवीन समस्यांना आमंत्रण देण्यासाठी तथा जुन्या आरोग्य समस्या आणखी त्रासदायक बनवण्यासाठी तणाव कारणीभूत ठरतो. त्यामुळे तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने, ध्यान धारणा आणि श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया तणाव आरोग्यासाठी कसा घातक ठरू शकतो.

जास्त ताण घेतल्याने डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो. जे लोक मायग्रेनने पीडित आहेत त्यांच्यासाठीही तणाव त्रासदायक ठरू शकतो.

स्नायू आणि सांधेदुखीसाठी जबाबदार असलेल्या कारणांपैकी तणाव घेणे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण असू शकते.

अशा स्थितीत पीडितास छातीत वेदना व्हायला लागतात. तज्ज्ञांच्या मते तणावामुळे हृदयरोगांनाही निमंत्रण मिळते. त्यामुळे तणाव खूप घातक आहे.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते जर पीडित तणावावर योग्य नियंत्रण ठेवू शकत नसेल तर त्यास अनिद्रेचा त्रास जाणवतो. तणावाने घेरल्यामुळे वारंवार झोप मोडते किंवा पुरेशी झोप होत नाही.

अशा स्थितीत भूक कमी-जास्त व्हायला लागते. अनेकजणांची भूक कमी होते आणि वजन घटते. तसेच काही लोकांची भूक अचानक वाढते आणि ते अनहेल्दी फूडचे सेवन करण्यासाठी प्रेरित होतात.

जे लोक आधीपासूनच पाठदुखीने त्रस्त असतात. त्यांचा त्रास तणावादरम्यान आणखी वाढू शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment