नागपंचमी : सुख-समृद्धी प्राप्तीसाठी आज करा कालसर्प यंत्राची स्थापना

नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. असे मानण्यात येते की या दिवशी जे लोक नागाची पूजा करतात त्यांना आयुष्यभर नागाची भीती वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोष असेल तर त्याने आजच्या दिवशी या दोषाची शांती करून घ्यावी.
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील प्रथम, चतुर्थ, सप्तम, आणि दहाव्या स्थानात सूर्य, मंगळ, शनि आणि राहु, केतू हे सर्व पाप ग्रह एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केंद्रस्थ असतील तर त्याच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो. त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा, संघर्षाचा सामना करावा लागतो. या व्यक्तीला प्रयत्नांनंतर यशप्राप्तीही होते. मात्र, त्याच्या कुंडलीतील ग्रह त्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने अडचणी निर्माण करतात.
कालसर्प यंत्राची स्थापना व पूजन विधी
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर महादेवाचे ध्यान करावे. त्यानंतर कालसर्प दोष यंत्राचे पूजन करावे. सर्वात पहिले दुधाने कालसर्प यंत्राला अभिषेक करा. त्यानंतर गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर गंध, पांढरे फुल, धूप, दीप इ. गोष्टींनी यंत्राची पूजा करा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने कमीत कमी एक माळ जप करा.
मंत्र
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।
या प्रकारे दररोज कालसर्प यंत्राची पूजा केल्याने तसेच मंत्राचा जप केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होऊ लागेल. तुम्हाला सुख-समृद्धी लाभेल.







