जाहिरात
 
 
 

जेव्हा आपण आतून हिंसक होत असतो, तेव्हा...

 
Source: धर्म डेस्क   |   Last Updated 23:29(30/01/12)
 
 
 

आपल्या आत दोन गोष्टींचा संघर्ष सुरूच असतो. हिंसा आणि अहिंसा. बाहेर भलेही आपण प्रदर्शन करीत नसलो तरी आपण कधी कधी आतून हिंसक होत जातो. त्याची नोंद केल्यास आपण कायद्याच्या चौकटीत बसू शकतो आणि त्याचा दंडही भोगावा लागेल. अहिंसा व हिंसेची हीच वृत्ती आपल्याला शांतता आणि अशांततेकडे घेऊन जाते. आजकाल सहजासहजी कोणतेही काम होताना दिसत नाही. अशा वेळी आपण आतून हिंसक होण्याची शक्यता असते. मात्र जीवनात ध्येयापर्यंत पोचायचे असेल तर आपल्यातील हिंसेचे निर्मूलन करावे लागेल. जेव्हा आपण आतून हिंसक होत असतो, तेव्हा आपली बाहेरील क्रियाही प्रभावित होत असते. आपला व्यवहार कोरडा होतो. जोराने बोलू लागतो आणि अशात आपले लोकांशी संबंध खराब होतात. नाहीतर तेही अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात. एकंदरीत सर्व ऊर्जा ज्या कामासाठी वापरायला हवी, त्या कार्यासाठी वापरण्यात येत नाही. आपण आतून जेवढे अहिंसक, शांत होऊ, तितकाच प्रभाव आसपासच्या लोकांवर पडेल. आपली अशांतता दुस-याच्या शरीरावर आपला प्रभाव ठेवत असते आणि आपली शांतता दुस-याच्या चेतनेवर असर टाकीत असते. अशांततेचा काळ, ऊर्जा आणि संबंध या तिन्ही गोष्टी नष्ट करीत असते. तसेच शांतता या तिन्ही गोष्टींना मजबूत करीत असते. कारण प्रकृतीचा मूळ स्वभाव आहे शांत राहणे. त्यामुळे कोणतेही काम करताना प्रकृतीशी जोडून राहा आणि रोपटे, झाडासारखी ऊर्जा प्राप्त करीत राहा. आपल्या भोवतालच्या वातावरणात शांतता आणा. आपल्यासाठी प्रत्येक कार्य सरळ होईल.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 2

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment