Home » Jeevan Mantra » Jyotish » Introduction-Of-Sun-Line-In-Palm-According-Palmistry

हातावर असेल ही रेषा तर मिळेल भरपूर पैसा आणि सन्मान

धर्म डेस्क उजैन | May 18, 2012, 12:18PM IST
हातावर असेल ही रेषा तर मिळेल भरपूर पैसा आणि सन्मान

आयुष्यात सगळ्यांनाच मान सन्मान आणि पैसा हवा असतो. काही जणांना मेहनत न करता भरपूर पैसा मिळतो तर कष्ट करूनही काही जणांना आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागते.

आपल्या हातावर दिसणार्‍या हस्तरेषांचा आपल्या भविष्य़ाशी बराच जवळचा संबध आहे. या हस्तरेषांच्या सह्यायाने आपण भविष्यात घडणार्‍या गोष्टींचा अंदाज लावू शकतो. हातावर असणार्‍या प्रत्येक रेषेचे वेगवेगळे महत्व सांगण्यात आले आहे.

मान-सन्मान, पैशासंबधी हातावरील रेषा ही सुर्य रेषा म्हणुन ओळखली जाते. दोषरहित सुर्य रेषेमुळे आयुष्यात भरपूर मान-सन्मान मिळतो.सुर्यरेषा ही करंगळीच्या खालील बाजूला असते.

हातावर सुर्यरेषा असणे शुभ मानले जाते. ज्या व्यक्तीच्या हातावर ही रेषा नसते त्या व्यक्तींना समाजात मान-सन्मान आणि पैसा मिळवण्यासाठी भरपूर मेहनेत घ्यावी लागते. ज्या व्यक्तींच्या हातावर ही रेषा नसते त्यांनी सुर्यदेवतेची कृपादृष्टी राहण्यासाठी सुर्य देवतेची आराधना करणे फायद्याचे ठरू शकते. गरिब लोकांना पिवळ्या रंगाच्या वस्तु दान केल्याने किंवा शिवलिंगावर पाणी व्हायल्याने देखील दोष निवारण होउ शकते.

Email Print
0
Comment