आपल्या हातातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चुका होत असतात. त्याची आपल्याला कल्पनाही नसते. मात्र, या चुकांचा जमाखर्च शनि देव ठेवत असतात. आपल्या हातून झालेल्या चुकांची शिक्षा म्हणून ते आपल्या मागे लागतात. आपण त्याला शनिदोष म्हणतो. साडेसातीच्या प्रभावामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राशीतील शनिदोष दूर करण्यासाठी खाली दिलेले 10 सोपे उपाय आपल्याला लाभदायी ठरणार आहेत. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची आराधना करावी.
>दर शनिवारी सकाळी लवकर उठून राहू-केतूच्या धातूच्या अथवा काचाच्या मूर्तीची विधीवत पूजा करावी.
>पूजेत करताना काळे तांदूळ, काळे वस्त्र, काळे फूल आणि काळे चंदनाचा वापर करावा.
>ही पूजा पिंपळ वृक्षाखाली केल्यास तात्काळ फळ मिळेल.
>पूजा झाल्यानंतर पिंपळ वृक्षाच्या सात परिक्रमा कराव्यात.
>परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर कच्चे सुत पिंपळ वृक्षाला गुंढाळावे.
>आपले दु:ख, कष्ट आणि सर्व समस्यांचे विवारण करण्यासाठी शनि देवाला प्रार्थना करावी.
>लोखंडाच्या वाटीत तेल भरून काळे तीळ अथवा काळ्या वस्तू दान कराव्यात.
>काळे वस्त्र, काळी गाय, काळी बकरी अथवा लोखंडी भांडे दान करावेत.
>नियमित हनुमान चालिसाचे पठन करावे.
> दररोज सकाळी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करुन परिक्रमा करावी.