तुमचे ध्येय नेहमीसाठी जिवंत ठेवील, अशी प्रेरणा यशाचे स्पंदन आहे. आता आपल्या गुणांचे मिलन अशा व्यक्तीसोबत करावे, ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेरणास्रोत मानता किंवा तुम्ही ज्यांच्यापासून खूप प्रभावित आहात.
> तुमची लायकी त्या व्यक्तीच्या बरोबरीने आहे काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीनुसार विचार करता काय?
> तुम्ही त्या व्यक्तीसारखे निर्णय घेऊ शकता काय ?
> तुम्ही भविष्यावर त्या व्यक्तीप्रमाणे नजर टिकवू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे संकटांचा सामना करू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे कणखर दिसता काय?
> तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे शक्तीचे प्रदर्शन करू शकता काय ?
> तुम्ही पर्यायांना त्या व्यक्तीच्या बरोबरीने न्याहाळू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीसारखी मेहनत करू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे जबाबदारी पार पाडू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे स्वत:मध्ये बदल करू शकता काय ?
> तुम्ही आपला राग त्या व्यक्तीप्रमाणे शांत करू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे संकल्प करू शकता काय ?
> तुम्ही त्या व्यक्तीच्या बरोबरीने ईश्वरावर श्रद्धा ठेवता काय ?
जेव्हा तुमचे 12 पेक्षा जास्त उत्तर हो असेल, तर ज्याने तुम्हाला प्रभावित केले आहे त्या व्यक्तीसारखेच तुम्ही व्हाल. त्यामुळे 12 च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण एक महत्त्वपूर्ण क्षण तुमचा कायापालट करू शकतो.