सोमवारी पांढ-या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे. यामागे ग्रह - ता-यांचा संबंध लपलेला आहे. ज्योतिषशास्त्रानूसार, पांढरा रंग हा चंद्राशी संबंधीत आहे. चंद्र हा कोणत्याही व्यक्तिला रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देऊ शकतो.
ज्या व्यक्तिच्या जन्मकुंडलीत चंद्र चांगल्या स्थितीत असेल तर ती व्यक्ति कोणतेही काम हे कलात्मक पध्दतीने पूर्ण करते. चंद्राला तुमच्या मनाचा स्वामी मानले जाते. चंद्राच्या शुभ-अशुभ स्थितीचा परिणाम हा सरळ सरळ व्यक्तिच्या मनावर प्रभाव पाडतो. कुंडलीतील अशुभ स्थितीतील चंद्र हा त्या व्यक्तिचा बौद्धीक त्रास वाढवितो.
जर एखाद्या व्यक्तिच्या कुंडलीत चंद्र अशुभ स्थितीत आहे, पाप ग्रहांची त्याच्यावर वक्रदृष्टी आहे किंवा तो पाप ग्रहांच्या स्थिती आहे तर चंद्रासंबंधीचे उपाय करणे गरजेचे आहेत.
त्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सुचविलेले आहेत. त्यातीलच एक उपाय आहे, पांढ-या रंगाचा वापर करणे.
ज्योतिषशास्त्रानूसार सोमवार हा शिव शंकाराप्रमाणेच चंद्राची पूजा करण्याचा दिवस आहे. यामुळे चंद्राची कृपदृष्टी राहून चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच सोमवारी पांढ-या रंगाचे कपडे परिधान करणे कधीही चांगले. यासोबत प्रत्येक सोमवारी शिवलिंगाला दुधाचा अभिषेक आणि जल अर्पण करावे. यासोबतच पांढरी फुलेही वाहावी. प्रसाद चढवावा. याप्रकारे तुम्ही चंद्राकडून चांगले योग प्राप्त करुन घेऊ शकता.
चंद्र जर तुमच्या सोबत असेल तर, तुमची बुद्धी अधिक कार्यक्षम होऊन तुम्ही कामात नव्या - नव्या कल्पना वापरून कलात्मकरित्या कार्य सिद्धीस घेऊन जाल.