श्रावण महिना म्हणजे मौज करण्याचा महिना. सगळीकडे आनंदाच्या लाटा उसळत असतात. उत्साहाचा वर्षाव होत असतो. पृथ्वीवर निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असतो. या आल्हाददायक महिन्यापासूनच सणांची रेलचेल सुरु होते. जिकडे तिकडे आनंदी-आनंद...!
आषाढीनंतर सणमहोत्सवांना सुरुवात होते. 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत अधिक मास राहणार असून यापूर्वी भाद्रपदामध्ये 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993 मध्ये अधिक मास आला होता. यानंतर भाद्रपदात अधिक मासाचा योग 2031मध्ये आहे.
भारतीय संस्कृतीत सणवार, व्रतवैकल्ये, उत्सवांना विशेष महत्त्व आहे. आषाढाच्या उत्तरार्धापासून चतुर्मासाला प्रारंभ झाला असून या वर्षी अधिक मास आल्याने देवशयन कालावधी पाच महिन्यांचा राहणार आहे. त्यामुळे यंदा चतुर्मासही पाच महिन्यांचा गणला जाणार आहे. अधिक मासामुळे यंदा सणांबरोबर श्राद्ध पक्षही एक महिना पुढे गेले आहे. एवढेच नव्हे तर यामुळे लग्नाचे मुहूर्तही एक महिना उशिराने येणार आहेत.
शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रावण महिन्यातील सणवार आणि त्यांचे विधी...