कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यातील माधुर्य कमी होता कामा नये

..ईश्वराप्रती सर्मपण असेल तर परमात्म्याचे दर्शन सहज होणे शक्य असते. सर्मपण हीच योग्याची खरी ओळख असते.
कर्मयोग्याचे अनेक उदाहरणे आहेत. या जगामध्ये अनेक महात्मा होऊन गेले. मात्र, कबीर, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नरसी मेहता, तिरुवल्लस्वामी आदी संतांचे आपण उदाहरण पाहू शकतो. अशा सतांनी कर्म केले. मात्र, ते कधीही बंधनामध्ये अडकले नाहीत. त्याचबरोबर अनेक संन्याशांनी ईश्वराप्रती संपूर्ण सर्मपण केले; पण अशा संन्याशी लोकांनाही शरीरधर्म निभवावा लागला आहे, तसेच लोकल्याणार्थ कर्मही करावे लागले आहेत. प्रारब्धवश किंवा तपामुळे अनेक संन्याशांना मनाने कर्मरत व्हावे लागते. मात्र, संतांच्या तुलनेत त्यांचा पुण्यसंचन आणि त्याग कमी पडतो. त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, अशा व्यक्तींचा संन्यास अनेक बंधनांमध्ये अडकलेला असतो. मात्र, त्यांचा त्याग, प्रयत्न व्यर्थ जात नाहीत. असे लोक योग भ्रष्टोभिजयते या स्थितीमध्ये पोहोचतात. नऊ जन्माने ते पुढे जातात. अशा लोकांची, संन्याशांची परमात्म्याच्या भेटीच्या दिशेने यात्रा सुरूच असते.
आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या माधुर्यासह आपला पराक्रम दाखवणार आहे. याचेच नाम जीवनाचा समतोल आहे. आपण कितीही काम, कष्ट करावे, पराक्रम दाखवावा हे सर्व करताना मात्र त्यामध्ये माधुर्य असणे आवश्यक असते. आपल्या जीवनातील मधुरता कधीही लोप पावता कामा नये. युद्धादरम्यान अथवा युद्धानंतरही आपण जीवनात गोडी, माधुर्य ठेऊ शकतो, अशी श्रीकृष्ण शिवकण देतात. आपल्या व्यक्तिमत्त्वातील मधुरता कायम राहायला हवी, असे ते म्हणतात. मधुरता आपली ओळख असायला हवी आणि ती व्यक्त करण्यासाठी केवळ थोडेसे हसावे लागते अथवा चेहरा हसतमुख ठेवावा लागतो.
आपल्या जीवनात मधुरता कायम ठेवायची असेल, तर हास्य हा सर्वात महात्त्वाचा उपाय आहे. आपण हसतमुख राहिलो तर आपले आंतरिक मनही मधुर बनते.







