जाहिरात
 
 

एकमेकांमधील प्रेम वाढवण्यासाठी मधुर वाणी महत्त्वाची

 
Source: पं. विजयशंकर मेहता   |   Last Updated 18:03(08/12/11)
 
 
 
 
 

सध्याच्या काळात कुटुंबांमध्ये अनेक बदल झालेले दिसून येत आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे चर्चा करण्याचे केंद्रही बदलले आहे. जवळचा, अतिजवळचा माणूसही कामापुरतीच गोष्ट करीत असतो. चर्चा थोडी दीर्घ स्वरूपाची झाल्यावर भांडणात रूपांतर होते. सर्वांना आपलेच खरे आहे हे पटवून देण्याची घाई असते. कोणीच दुसर्‍याचे ऐकायला तयार नसतो. बोलणे ही एक शैली असते. कारण की आपण दिवसभर बोलत असतो. त्यामुळे विसरत असतो की कसे बोलायला हवे. वाणी कुटुंबांमध्ये शांती आणि अशांतीचे एक मोठे कारण आहे. सुंदरकांडामध्ये रामाचा विरहसंदेश सीतेपर्यंत पोहोचवायचा होता. सीता दु:खी होती आणि राम मला का विसरले याबाबत तक्रारही होती. हनुमानाने सीतेला संदेश देताना आपली गोष्ट साध्या आणि सरळ पद्धतीने सांगितली. कपि के बचन सप्रेम सुनि उपजा मन बिस्वास, जाना मन क्रम बचन यह कृपासिंधू कर दास. हनुमानाची ही प्रेमपूर्वक गोष्ट ऐकूण सीतेच्या मनात विश्वास उत्पन्न झाला. तिने जाणले की हे मन, वचन आणि कर्माने कृपासागर रामाचा दास आहे. तो रामाचा सेवक आहे, हे जाणून अत्यंत आनंद झाला. डोळ्यांमध्ये प्रेमाचे आनंदार्शू आले आणि शरीर अत्यंत हलके झाले. हनुमान आपल्याला प्रथम हे शिकवत आहे की त्यांचे वचन हे प्रेमयुक्त होते. त्यामुळे सीतेच्या मनात विश्वास निर्माण झाला. कुटुंबांमध्ये वाणीत कर्कशपणा स्वाभाविकपणे उतरत आहे. मधुर आणि नम्रपणे बोला. त्यालाच प्रेमयुक्त वचन म्हणता येईल. आज घरांमध्ये एकमेकांवर विश्वासच ठेवत नाहीत. वाणी ही एकमेकांसाठी प्रेम वाढवण्यासाठी साहाय्यक आहे.

 
 
 
 
 
 
 
 
आपके विचार

नहीं दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

कोड :
3 + 8

 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment