
आपल्या जीवनाचे मालक आपण स्वत: आहोत. मात्र अधिकाधिक आपण दुसर्यांकडून संचालित होत असतो. आपल्याविषयी लोक काय म्हणत असतील याबाबत अधिक चिंता करू नका. परंतु कुटुंब आणि समाजाचे जे सामान्य नियम आहेत, त्याचेही उल्लंघन करू नका. दुसर्याची पर्वा करू नका याचा अर्थ असा नाही की आपण स्वच्छंद आणि स्वैराचारी बना. ज्या वेळी आपण भान राखून असतो, त्या वेळी आपण जाणून असतो की हे भान दुसर्याकडून प्रभावित होऊ देऊ नये. दुसर्यामुळे आपली शांतता भंग करू नका. समजून घ्या की असे का होत आहे? माणूस तीन गोष्टींवर टिकून आहे. पहिले शरीर, दुसरे मन आणि तिसरा आत्मा. जितके आपण शरीरावर टिकून राहू तितकेच आपण दुसर्याकडून संचालित होऊ. शरीराचे महत्त्व नाकारायला नको. परंतु त्यालाच सर्व काही समजू नका. आहार आणि औषध यांच्यातच सध्या शरीर फिरत आहे. लोकांच्या कमाईचा एक मोठा हिस्सा उपचारांवर खर्च होत आहे. त्यामुळे केवळ शरीरावर टिकून राहणे अशांततेला आमंत्रण देण्यासारखे आहे. काही लोक केवळ मनावर टिकून आहेत. हे पहिल्या स्थितीपेक्षाही अधिक धोकादायक आहे. मनाच्या आजाराचा इलाज तर चांगल्यातल्या चांगल्याजवळही नाही. आता जे साधक आहेत, त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की या दोन्हींपेक्षा थोडे पुढे जावे. पुढे आत्म्याचा संसार आहे आणि जसे आपण त्यावर टिकून राहू, तेव्हा जीवनाचे महत्त्वपूर्ण निर्णय आपले होत जातात. दुसरा कोणी आपल्याला सुखी करू शकतो ना दु:खी. कोणी आपल्याला त्रास देऊ शकत नाही आणि आपणही दुसर्याला दु:खी करू शकत नाही.