जाहिरात
 
 
 

या गणेश मंत्राने नोकरी आणि व्‍यवसायात होईल भरभराट...

 
Source: धर्म डेस्क. उज्जैन   |   Last Updated 17:56(31/01/12)
 
 
 

शास्‍त्रांमध्‍ये धन मिळवण्‍यासाठी कर्म आणि उद्योग म्‍हणजेच परिश्रम श्रेष्‍ठ मानले गेले आहे. व्‍यावहारिक जीवनात मेहनतीचे हेच रूप नोकरी किंवा व्‍यापाराच्‍या रूपात दिसून येते. त्‍याच्‍या आधारे एखादी व्‍यक्‍ती धन जमवून आयुष्‍य सफल आणि सुखी बनवण्‍याचा प्रयत्‍न करतो.

आनंदी जीवन जगण्‍यासाठी धन कमावणे महत्‍वाचे असते. व्‍यवसायात यशाबरोबरच योजना प्रत्‍यक्षात अवलंबवण्‍यासाठी धनाचीही गरज असते.

हिंदू धर्मात भगवान श्री गणेशास विघ्‍नहर्ता मानले गेले आहे. त्‍यामुळे नोकरी किंवा व्‍यापारात धन लाभासाठी किंवा धनाची कमतरता भासू नये यासाठी गणेश मंत्राच्‍या जपाचा उपाय सांगण्‍यात आला आहे. रोज घरातून बाहेर पडताना, दुकान उघडताना किंवा कार्यालयात पोचल्‍यानंतर श्री गणेशास गंध, अक्षता, फूल, धूप आणि दिवा लावून पूजा करावी. पूजा साहित्‍य नसेल तर मनातल्‍या मनात सामु्ग्री अर्पण करून खालील गणेश मंत्र म्‍हणावे.



ॐ गणेश महालक्ष्यै नम:

या गणेश मंत्राचे दररोज पठण करावे. विशेषत: बुधवारी आणि चतुर्थीच्‍या दिवशी अवश्‍य करावे. त्‍यामुळे नोकरीत किंवा व्‍यवसायात तोटा होत नाही. तसेच सातत्‍याने यशही मिळू शकते.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment