जाहिरात
 
 
 

ज्ञानमुद्रेद्वारे जागृत करा तुमच्या सुप्त शक्ती!

 
Source: दिव्य मराठी नेटवर्क   |   Last Updated 14:43(22/02/12)
 
 
 

योगशास्त्रात ज्ञानमुद्रेचे अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानमुद्रेच्या साहाय्याने आपण आपल्या सुप्त शक्तीही काही क्षणात जागृत करू शकता. आपल्या हातातील नसाचा संबंध सरळ मेंदूशी असतो. डाव्या हाताचा संबंध उजव्या मेंदूशी तर उजव्या हाताचा संबंध डाव्या मेंदूशी असतो. त्यामुळे आपल्याला मानसिक आजारांपासून मुक्ती मिळते. विशेष म्हणजे आपल्याला जडलेली व्यसन सुटते. उदा. सिगारेट, विडी, तंबाखू आणि दारू. 

ज्ञानमुद्रेची करण्‍याची पद्धत:

अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट एकमेकांना स्पर्श करेल, अशा अवस्थेत ठेवून इतर तीन बोटांना सरळ ठेवावे. सिद्धासन, उभे राहून किंवा झोपेतही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या मुद्राचे प्रयोग करावा.

ज्ञानमुद्रेपासून होणारे लाभ:

ज्ञानमुद्रेमुळे स्मरण शक्तीत वाढ होते. हाताच्या अंगठ्याच्या दोन्ही बाजुंच्या ग्रंथी सक्रिय होतात. ज्ञानमुद्रा आपली एकाग्रता वाढविते. निद्रानाश, हिस्टेरिया, संताप आणि निराशेला ही मुद्रा दूर करते.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment