Home » Sports » Latest News » Australian Rookie Spinner Could Get Test Debut Against India

टीम इंडियाविरूद्ध फिरकीपटू अ‍ॅश्‍टन एगरची पदार्पणाची शक्‍यता

वृत्तसंस्‍था | Feb 15, 2013, 14:32PM IST
टीम इंडियाविरूद्ध फिरकीपटू अ‍ॅश्‍टन एगरची पदार्पणाची शक्‍यता

मेलबर्न- टीम इंडिया आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यादरम्‍यान चेन्‍नई येथे 22 फेब्रुवारीपासून सुरू होणा-या कसोटी मालिकेतील पहिल्‍या कसोटीत 19 वर्षीय युवा फिरकीपटू अ‍ॅश्‍टन एगर पदार्पण करण्‍याची शक्‍यता आहे.

उल्‍लेखनीय म्‍हणजे, एगरकडे अवघ्‍या दोन प्रथमश्रेणी सामन्‍यांचाच अनुभव आहे. शनिवारपासून भारत अ विरूद्ध होणा-या सराव सामन्‍यात तो खेळणार आहे. अध्‍यक्षीय संघाविरूद्ध सराव सामना खेळल्‍यानंतर त्‍याला ऑस्‍ट्रेलियाला रवाना व्‍हायचे होते. मात्र, निवडकर्त्‍यांनी त्‍याला भारतात राहण्‍यास सांगितले आहे.

एगरने पश्चिम ऑस्‍ट्रेलियाकडून दोन शेफिल्‍ड सामने खेळले आहेत. डावखुरा फिरकीपटू असलेल्‍या एगरला ऑस्‍ट्रेलियाच्‍या विद्यमान संघातील फिरकीपटू नॅथन ल्‍योनबरोबर खेळवले जाऊ शकते. विशेष म्‍हणजे, या जागेसाठी जेवियर डोहर्टी आणि ग्‍लॅन मॅक्‍सवेल ही शर्यतीत आहेत. एगरने पहिल्‍या सराव सामन्‍यात आठ षटकांत 27 धावांच्‍या बदल्‍यात एक विकेट मिळवली होती.

Email Print
0
Comment