Home » Sports » Cricket » Latest News » Bhajji's One Century Today

भज्जीचे एक ‘शतक’ आज होणार

वृत्तसंस्था | Feb 22, 2013, 01:10AM IST
भज्जीचे एक ‘शतक’ आज होणार

चेन्नई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 कसोटी विकेट घेणारा ऑफस्पिनर हरभजनसिंग चेपॉकवर आपल्या कारकीर्दीतील 100 वी कसोटी खेळेल. त्याने सामन्यात दहा विकेट घेतल्या, तर कांगारूंविरुद्ध बळींचे शतक तो पूर्ण करू शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटरवर भज्जी चेन्नई कसोटी खेळणार असल्याचे स्पष्ट केले. मंडळाने भज्जीचे अभिनंदन केले. तो 100 कसोटी खेळणारा दहावा भारतीय खेळाडू ठरेल.

यावर हरभजनने प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मी थोडा नर्व्हस आहे, मात्र चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी सुरुवातीला शंभराव्या कसोटी खेळणे आणि आणखी पुढचे 50 सामने कसा खेळू शकतो, याचा विचार आणि प्रयत्न करेन. बहुदा मला पूर्वीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल,’ असे भज्जीने म्हटले.
99 कसोटीत 32.27 च्या सरासरीने 408 बळ घेणा-या 32 वर्षीय हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 कसोटीत 29.35 च्या सरासरीने 90 गडी बाद केले आहे. यात एका डावात सात वेळा पाच विकेट आणि तीन वेळा दहा विकेट घेतल्या आहेत.

Email Print
0
Comment