जाहिरात
 
 
 

दैनिक भास्कर बनला ‘भोपाळ बादशाह’चा ग्लोबल पार्टनर!

 
Source: दिव्य मराठी न्यूज नेटवर्क   |   Last Updated 01:08(23/02/12)
 
 
 

भोपाळ - देशातील सर्वाधिक मोठा मीडिया समूह दैनिक भास्कर हा ब्रिजस्टोन वर्ल्ड सिरीज हॉकी (डब्ल्यूएसएच) स्पर्धेत सहभागी होत असलेल्या ‘भोपाळ बादशाह’ संघाचा ग्लोबल पार्टनर बनला आहे. डीबी कॉर्प लिमिटेडचे संचालक गिरीश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.  

‘पहिल्या वर्ल्ड सिरीज हॉकी स्पर्धेत पार्टनर बनणे ही अभिमानाची बाब आहे. आम्ही यामुळे खूप आनंदित झालो आहोत. हॉकी चाहत्यांसाठी ही अतिशय चांगली बातमी आहे. ‘भोपाळ बादशाह’ संघासोबत जुळण्याचा खूप भावुक निर्णय आहे. भोपाळच्या अनेक खेळाडूंनी हॉकीत मोठे नाव कमावले आहे. आम्ही डब्ल्यूएसएचसोबत यापुढेही काम करू आणि हॉकीला शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करणार आहोत,’ असेही गिरीश अग्रवाल यांनी या वेळी नमूद केले.  

निम्बस स्पोर्ट्सचे कार्यकारी अधिकारी येनिक कोलाको यांनी भास्कर समूहाच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘आपली कटिबद्धता आणि भागीदारीसह भास्कर समूह या खेळाच्या प्रगतीसाठी मुख्य भूमिका पार पाडेल. आम्हा दोघांसाठी ही फायद्याची पार्टनरशिप आहे,’ असे कोलको यांनी म्हटले. भोपाळ बादशाह संघात अनेक नामवंत देशी-विदेशी खेळाडू सामील आहेत. स्पर्धेतील पहिला सामना भोपाळ बादशाह वि. चंदीगड कॉमेंट्स यांच्यात होणार आहे. डब्ल्यूएसएच 29 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2012 दरम्यान होणार आहे. यात एकूण 59 सामने होतील. विजेत्या संघाला जवळपास 20 लाख डॉलर (जवळपास 10 कोटी रु.) बक्षीस रक्कम मिळेल. डब्ल्यूएसएचमध्ये बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, जालंधर, मुंबई आणि पुणे हे संघ खेळणार आहेत. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण 30 देशांत केले जाईल. 

संघ : भोपाळ बादशाह.

कोच : व्ही. भास्करन.  कर्णधार : सरदारासिंग.

संघाचे प्रमुख खेळाडू : बलजिंदरसिंग, व्ही. आर. रघुनाथ, गिरीश पिंपळे, एन. सेथिलकुमार, समीर दाद, शिवेंद्रसिंग, तुषार खांडेकर, बलजितसिंगसह 22 खेळाडू्

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment