Home » Sports » Expert Comment » If Tendulkar Retires, Test Cricket Will Die Says Ranatunga

सचिन निवृत्त झाल्‍यानंतर कसोटी क्रिकेट होईल मरणासन्‍नः रणतुंगा

वृत्तसंस्‍था | Feb 22, 2013, 12:04PM IST
सचिन निवृत्त झाल्‍यानंतर कसोटी क्रिकेट होईल मरणासन्‍नः रणतुंगा

बंगळुरुः मास्‍टर ब्‍लास्‍टर फलंदाज सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्‍यानंतर कसोटी क्रिकेट मरणासन्‍न होईल, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जूना रणतुंगा याने व्‍यक्त केले आहे.

सचिनने कसोटी क्रिकेट खेळतच रहावे, असे सांगून रणतुंगा म्‍हणाला, सचिनसारखे खेळाडू निवृत्त झाले तर कसोटी क्रिकेटमधील रंगत निघून जाईल. त्‍याने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्‍यामुळे मला आनंद झाला आहे. माझ्या दृष्‍टीने कसोटी‍ क्रिकेटमध्‍ये क्रिकेटचे खरे ज्ञान आहे. तर इतर प्रकार म्‍हणजे मनोरंजनासाठी आहेत.

वन डे क्रिकेटमध्‍ये सचिनच्‍या पुनरागमानाबाबत तो म्‍हणाला, वयाच्‍या 39 वर्षीही सचिन अतिशय चांगला क्रिकेट खेळतोय. त्‍याच्‍यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्‍लक आहे. एक मोठी खेळी सचिनची कारकिर्द 2 वर्षांपर्यंत वाढू शकते.

Email Print
0
Comment