Home » Sports » Cricket » Latest News » India Win The Cricket Series

भारताचा मालिका विजय

उमेश शर्मा | Jan 24, 2013, 03:43AM IST
भारताचा मालिका विजय

मोहाली - भारतीय संघाने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 5 गडी राखून मालिका विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्मा (83) व सुरेश रैनाच्या नाबाद 89 धावांच्या बळावर भारताने पाहुण्या संघाला हरवले. यासह यजमान संघाने मालिकेत 3-1 ने निर्णायक आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 7 गडी गमावून 257 धावा काढल्या होत्या. भारताने 47.3 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. मालिकेतील पाचवा व शेवटचा वनडे 27 जानेवारीला धर्मशाळा येथे होणार आहे.
धावांचा पाठलाग करणा-या भारताकडून रोहित शर्माने 83 धावांची खेळी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत 93 चेंडंूत शानदार 83 धावा (11 चौकार, 1 षटकार) काढल्या. रोहितने चौथ्या गड्यासाठी विराट कोहलीसोबत 52 धावांची भागीदारी केली. कोहलीने 26 धावा काढल्या. रैना- धोनीने पाचव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. धोनीने 19 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, इंग्लंडकडून सलामीवीर कुकने 106 चेंडूंत 13 चौकारांच्या आधारे 76 धावा काढल्या. यासह पीटरसनने 93 चेंडंूत 76 धावा काढल्या. रूटने नाबाद 57 धावांचे योगदान इंग्लंडला दिले. इंग्लंडकडून इयान बेल (3), मोर्गन (3) व समीत पटेल (1) एकेरी धावा काढून तंबूत परतले.

अश्विनचा महागडा ओव्हर
आर. अश्विनच्या 45 व्या षटकात इंग्लंडच्या रूट व पीटरसनने 17 धावा काढल्या. यामध्ये रूटने एक षटकार व एक चौकार ठोकला. तसेच पीटरसनने 1 चौकार मारला आणि तीन धावा पळून काढल्या.
धोनी दुसरा यशस्वी कर्णधार
मोहाली येथील सामन्यात विजय मिळवून देणारा धोनी वनडेमध्ये दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 134 वनडे सामने खेळले. यामध्ये टीम इंडियाला 77 सामन्यांत विजयश्री मिळाली, तर 46 सामन्यांत संघाला अपयश आले. यापूर्वी, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 146 पैकी 76 वनडे सामने जिंकले होते.

अव्वल स्थान मजबूत
विजयानंतर भारतीय संघाने आयसीसी वन डे क्रमवारीतील अव्वल स्थान मजबूत केले. इंग्लंडवरच्या विजयाने भारताचे आता 120 गुण झाले आहेत. दुस-या स्थानी असलेल्या इंग्लंडचे 117 गुण आहेत. तसेच 113 गुणांसह
आॅस्ट्रेलिया तिस-या क्रमांकावर आहे.

Email Print
0
Comment