Home » Sports » Latest News » Indian Coach Required For Indian Cricket Team-Venktesh Prasad

भारतीय कोचची गरज : वेंकटेश प्रसाद

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Jan 05, 2013, 00:43AM IST
भारतीय कोचची गरज : वेंकटेश प्रसाद

इंदूर- टीम इंडियासाठी देशी प्रशिक्षक ठेवण्याचा सल्ला माजी गोलंदाज कोच वेंकटेश प्रसादने दिला. प्रशिक्षणाचा पूर्ण अनुभव असणा-याकडे ही जबाबदारी सोपवण्यात यावी, असेही तो म्हणाला. भारतीय संघाच्या गचाळ कामगिरीसाठी विदेशी प्रशिक्षक डंकन फ्लेचरला जबाबदार ठरवून भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचे सौरव गांगुलीदेखील म्हणाला.


‘मी गांगुलीच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. टीमला भारतीय कोचची आवश्यकता आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, विदेशी प्रशिक्षकाची हकालपट्टी करावी,’ असेही तो म्हणाला. गांगुलीला भारतीय संघाचा प्रशिक्षक व राहुल द्रविडला फलंदाजीचा कोच केले जावे का? या प्रश्नावर त्याने यातील मला काही माहीत नाही, असे सांगितले. मात्र, चांगला खेळाडू हा यशस्वी प्रशिक्षक असेल हे सांगता येत नाही, असेही तो म्हणाला.


संघाची शानदार कामगिरी भारतीय संघाच्या सुमार कामगिरीस वेंकटेश प्रसादने पूर्णपणे प्रशिक्षकाला जबाबदार धरले. भारतीय संघामध्ये प्रतिभावंत खेळाडू आहेत. युवा व अनुभवी खेळाडूंचा चांगला ताळमेळ आहे. मात्र, योजना तयार करताना गडबड होते. हे सावरणे आवश्यक आहे, असेही त्याने सांगितले.

Email Print
0
Comment